आमच्याविषयी
महाऑनलाईन हे महाराष्ट्राच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील एक क्रांतिकारी पाऊल आहे.
महाराष्ट्र शासन नागरिकांना त्यांच्या दारापर्यंत एक-खिडकी पध्दतीव्दारे
पारदर्शकरित्या जलद गतीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कटीबध्द आहे. या हेतूच्या
पूर्ततेसाठी महाऑनलाईनची स्थापना करण्यात आली.
ऑनलाईन पध्दतीने सेवांचा लाभ
महाऑनलाईनच्या कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत १०,४८३ गावांमध्ये आणि १,३३६ शहरी
भागांमध्ये नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने सेवांचा लाभ टप्प्या-टप्प्याने उपलब्ध करून
दिला जात आहे. यात सात बाराचा दाखला, जन्माचा तसेच मृत्युचा दाखला, ना-हरकत
प्रमाणपत्र, वारसा प्रमाणपत्र अशा अनेक प्रमाणपत्रांचा समावेश आहे.
रोजगार निर्मिती
वाजवी दर आकारून नागरिकांना अशा प्रकारच्या अनेक सेवा महाऑनलाईनमार्फत उपलब्ध होत
आहेत. त्याचबरोबर या सेवा देऊ करणा-या केंद्रांना असलेली मनुष्यबळाची आवश्यकता
लक्षात घेत रोजगार निर्मितीचे लक्ष्यही महाऑनलाईनमार्फत साध्य होत आहे. आजघडीला
कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून सुमारे ३५,००० सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार
उपलब्ध झाला आहे. आगामी काळात ही संख्या दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. ग्रामीण
भागातल्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाल्यामुळे केवळ रोजगाराच्या गरजेपोटी होणारे
त्यांचे संभाव्य स्थानांतर टळले आहे.
विविध विभागांची संकेतस्थळे
राज्य शासनाच्या विविध विभागांची संकेतस्थळे तयार करायचे महत्वपूर्ण कार्यही टीम
महाऑनलाईन करत आहे. उत्पादन शुल्क विभाग, साखर आयुक्तालय, अग्निशमन सेवा,
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, इकोव्हिलेज, टेक सॅटर्डे, महाराष्ट्र
प्राथमिक शिक्षण परिषद अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्व
संकेतस्थळांवरील माहिती इंग्रजीप्रमाणे मराठी भाषेतही उपलब्ध होत आहे. त्यामुळे
सर्वसामान्य मराठी माणसालाही आवश्यक ती माहिती मातृभाषेत उपलब्ध होत आहे.